क्राईम

ब्रेकिंग! पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर नवा कट

  • पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता पाकिस्तानसह दहशतवादी संघटना आणि कट्टरतावादी गट नव्या कावेबाजपणाच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. 
  • या संघटनांनी आता भारतीय रेल्वेला लक्ष्य करण्याचे नियोजन केल्याचे समोर आले आहे. काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या अनिवासी नागरिकांवर तसेच काश्मिरी पंडितांवर हल्ले होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे, ज्यामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत. 
  • जम्मू काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवाया वाढवण्याच्या तयारीत आहे. विशेषतः रेल्वे यंत्रणा, पोलीस कर्मचारी, CID अधिकारी तसेच इतर राज्यांतून आलेले अनिवासी रेल्वे कर्मचारी अन काश्मिरी पंडित ISI व दहशतवादी गटांच्या टार्गेटवर आहेत. उत्तर, मध्य आणि दक्षिण काश्मीरमधील रेल्वे यंत्रणेला खिळखिळं करण्याचा कट रचण्यात येत असल्याचेही स्पष्ट झालं आहे. 
  • रेल्वेच्या सेवेत असलेले अनेक अनिवासी कर्मचारी स्थानिक बाजारपेठांमध्ये फिरत असतात. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने नागरिकांना पुढील काही दिवस गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे अन सावध राहावे, असा इशारा दिला आहे.

Related Articles

Back to top button