महाराष्ट्र

अबू आझमींकडून औरंगजेबाचे गुणगाननंतर मुलगा फरहानची गुंडगिरी

  • समाजवादी पक्षाचे नेते व आमदार अबू आझमी यांनी काल आपल्या अकलेचे तारे तोडले होते. त्यांनी औरंगजेबाचे गुणगान केले होते. आता अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमी याची गुंडगिरी समोर आली आहे. त्याने थेट बंदूक काढत धमकावले आहे.
  • अबू आझमी यांचा मुलगा फरहान याने गोव्यात गुंडगिरी केली आहे. यू टर्न घेताना त्यांच्या गाडीला मागील गाडीचा धक्का लागला. त्यानंतर फरहान आझमी यांनी थेट बंदूक काढली. गाडी चालकांना बंदुकीचा धाक दाखवला. त्यावरुन त्याच्यावर कलम १९४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. गोवा पोलिसांनी फरहान याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. गोव्यातील कलंगुट बीचजवळ हा प्रकार झाला.
  • फरहान हा मर्सिडीज जी -वॅगन गाडीतून जात होता. त्यावेळी कांदोळी भागातून जात असताना त्याच्या कारने इंडिकेटर दाखवले नाही आणि वळण घेतले. यावरुन मोठा वाद झाल्यानंतर फरहान याने बंदूक काढली होती.

Related Articles

Back to top button