क्राईम

अशी क्रूरता औरंगजेबानेही…

  • मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे काही धक्कादायक फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या अमानुष घटनेवर राजकीय क्षेत्रातून संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. अशात प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी देखील प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. 
  • बच्चू कडू म्हणाले की, या हत्येची पद्धत पाहिली तर असे वाटते की, एवढी निर्घृण हत्या कदाचित कोणत्याही शत्रूनेही केली नसती. औरंगजेबानेही एवढं क्रूर कृत्य केले नसेल.
  • त्यांनी या प्रकरणाला जातीच्या चौकटीत पाहू नका, असा इशारा देत सांगितले, ही दोन जातींमधील लढाई नाही, तर ही एक प्रवृत्ती आहे. ही प्रवृत्ती वाढली कशी? याला खतपाणी घालणारे कोण? याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची नाही का?, असा संतप्त सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला.

Related Articles

Back to top button