राजकीय
पहिल्यांदाच 21 राज्यात भाजप

दिल्लीतील मोठ्या विजयानंतर देशाचा राजकीय नकाशा बदलला आहे. नव्या ताज्या निकालांनी देशाच्या 19 राज्यात आणि दोन केंद्र शासित प्रदेशात एनडीए सरकारचे राज्य शासन आहे. 21 पैकी सहा राज्यात एनडीएच्या सहकारी पक्षांची सत्ता आहे. तर 15 राज्यात भाजपच्या हाती सत्तेचे सुकाणू आहे. एवढेच नाही तर राजधानी दिल्लीतील मोठ्या विजयानंतर एनडीएकडे दोन्ही केंद्रशासित प्रदेशात सत्ता हाती आली आहे.
एनडीएच्याजवळ आता देशातील पाच मोठ्या राज्यांपैकी (यूपी, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार आणि तामिळनाडु ) तीन राज्यात सरकार आहे. युपी आणि महाराष्ट्रात भाजपचा स्वत:चा मुख्यमंत्री आहे. तर बिहारमध्ये भाजपचे मित्र पक्ष जेडीयूचे नितीश कुमार यांच्या हाती सत्ता आहे. देशाची लोकसंख्या 140 कोटीच्या आसपास आहे. दिल्लीच्या विजयानंतर एनडीएचे शासन 92 कोटी लोकांवर आहे.