राजकीय

ब्रेकिंग! भाजपच्या लाटेत दिग्गज भुईसपाट

  • दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. दिल्लीतील आम आदमी पार्टीची सत्ता संपुष्टात आली आहे. अरविंद केजरीवाल यांना हॅटट्रीक काही करता आली नाही. 
  • भाजपने जोरदार मुसंडी मारत दिल्लीची सत्ता आम आदमी पक्षाच्या हातातून अक्षरशः हिसकावून घेतली आहे. आम आदमी पक्षाचे दिग्गज नेतेही या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. जंगपूरा मतदारसंघातून दिग्गज नेते मनिष सिसोदिया यांचा पराभव झाला आहे.
  • नवी दिल्ली मतदारसंघात अरविंद केजरीवाल यांच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टीने माजी खासदार प्रवेश वर्मा यांना तिकीट दिले होते. या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दोन्ही उमेदवारांत अटीतटीची लढत झाली. सुरुवातीच्या मतमोजणीत केजरीवाल पिछाडीवर होते. नंतर मात्र त्यांनी आघाडी घेतली होती. परंतु, काही फेऱ्यांनंतर केजरीवाल पुन्हा पिछाडीवर पडले. नवव्या फेरीत केजरीवाल जवळपास 600 मतांनी पिछाडीवर होते. नंतर मात्र दोन्ही उमेदवारांतील अंतर वाढत गेले. अखेर प्रवेश वर्मा यांनी 3 हजार 186 मतांची आघाडी घेत केजरीवाल यांचा पराभव केला.

Related Articles

Back to top button