सोलापूर ते पुणे हुतात्मा एक्सप्रेसची वेळ बदला

सर्वांना परवडणारी गाडी म्हणजे सोलापूर ते पुणे व पुणे ते सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस होय. या गाडीचे तिकीट कमी असल्याने गोरगरिबांना ही गाडी वरदान ठरत आहे. मात्र या एक्सप्रेसच्या वेळेत बदल करण्याची मागणी सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सने केली आहे.याबाबतचे निवेदन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव देण्यात आले आहे. सध्या हुतात्मा एक्सप्रेस सोलापूर रेल्वे स्थानकावरून दररोज सकाळी साडेसहा वाजता सुटते. मात्र ही गाडी सकाळी सहा वाजता सुटल्यास प्रवाशांची सोय होणार आहे.
पुण्याहून सायंकाळी सहा वाजता सुटणारी इंटरसिटी एक्सप्रेस सर्वांच्या सोयीची आहे. मात्र या गाडीच्या वेळेत बदल करून ही गाडी रात्री साडेनऊ वाजता सोलापुरात यावी, अशी अपेक्षा चेंबूर ऑफ कॉमर्सने व्यक्त केली आहे. अशाप्रकारे या गाडीच्या वेळेत बदल केल्यास व्यापारी, विद्यार्थी व महिलांची सोय होणार असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.