सोलापूर
सोलापूर! शिवजयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडची मोठी मागणी
- सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपले आहे तरी पोलीस प्रशासनाच्यावतीने ऑनलाइन व ऑफलाइन उत्सव परवाना तात्काळ सुरू करावेत अशा मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्यावतीने पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना देण्यात आले.
- यावेळी पोलीस आयुक्तांनी येत्या दहा तारखेला पोलीस आयुक्त कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. चार दिवसात पोलीस स्टेशन वाईज बैठका होणार असून उत्सव परवानाबाबत कोणतीच अडचण मंडळाला येणार नाही, असे यावेळी सांगितले.
- संपूर्ण महाराष्ट्रात 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते. सोलापूर शहरातील विविध मंडळाच्यावतीने शिवजन्मोत्सव मोठ्या भव्य प्रमाणात साजरा करण्यात येतो. हा शिवजन्म सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रातून नागरिक सोलापूरमध्ये येतात. 14 ते 19 या कालावधीत विविध मंडळाच्या भव्य मिरवणूक निघतात. सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शांतता कमिटीची बैठक लवकर आयोजित करण्यात यावी तसेच ऑनलाईन व ऑफलाइन परवानगी प्रक्रिया सुरू करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
- यावेळी संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, उपाध्यक्ष फिरोज सय्यद, जिल्हासचिव बबन डिंगणे, मल्लिकार्जुन शेवगार, दिनेश वर्पे, सचिन जाधव उपस्थित होते.