क्राईम
ब्रेकिंग! घरगुती हिंसाचार प्रकरणात धनंजय मुंडे दोषी
- राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांना कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. करुणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी असल्याचा निर्वाळा कोर्टाने दिला आहे. तर, करुणा शर्मा यांना दरमहा दोन लाख रूपये पोटगी देण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. वांद्रे इथल्या कौटुंबिक न्यायालयाने हा निकाल दिला आहे. त्याशिवाय मुंडे यांनी कौटुंबिक हिंसाचार केल्याचा निर्वाळाही कोर्टाने दिला आहे.
- मागील काही महिन्यांपासून मुंडे हे चांगलेच वादात अडकले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपीशी असलेल्या संबंधावरून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. तर काही दिवसांपूर्वीच कृषीमंत्री असताना त्यांनी घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर आता करुणा शर्मा यांच्या याचिकेवर वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने निकाल दिला आहे.
- मुंडे यांनी घरगुती हिंसाचार केल्याचा आरोप कोर्टाने मान्य केला आहे. वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. त्याशिवाय करुणा शर्मा यांना दरमहा दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.