देश - विदेश
ब्रेकिंग! खासदार प्रणिती शिंदे यांचे हटके आंदोलन
![](https://solapurviralnews2.com/wp-content/uploads/2025/02/IMG_20250206_50572-780x470.jpg)
- अमेरिकेत राहत असलेल्या १०४ भारतीयांना एकाद्या गुन्हेगाराप्रमाणे हातापायांना बेड्या घालून अपमानास्पद रीतीने मायदेशी परत पाठवल्याच्या विरोधात काँग्रेस, इंडिया आघाडीच्यावतीने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी, खासदार प्रणिती शिंदे व इतर खासदार यांच्या उपस्थितीत निदर्शने आंदोलन करण्यात आले.
- अमेरिकेत राहत असलेल्या १०४ भारतीयांना हातापायांना बेड्या घालून अपमानास्पदरित्या मायदेशी परत पाठवल्याच्या विरोधात काँग्रेस, इंडिया आघाडीच्या विरोधी खासदारांनी नवी दिल्ली संसद भवन परिसरात निदर्शने केली आणि केंद्र सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध केला. भारतीयांचा अपमान झाला, भारत गप्प बसणार नाही असे लिहिलेले बॅनर हातात घेऊन त्यांनी सरकारवर परदेशात असलेल्या भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला. काँग्रेस इंडिया आघाडीच्या खासदारांनी हद्दपारीच्या परिस्थितीबाबत तात्काळ राजनैतिक हस्तक्षेप आणि पारदर्शकता आणण्याची मागणी केली. वाढत्या स्थलांतरित समस्यांबाबत सरकारकडून प्रतिसाद मिळत नसल्याबद्दलही त्यांनी टीका केली आणि भारतीय स्थलांतरितांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी अधिक मजबूत धोरणे आखण्याची मागणी केली. या निषेधात भारताच्या जागतिक स्थानाबद्दल आणि नागरिकांच्या प्रतिष्ठेबद्दलची चिंता करण्यात आली.