सोलापूर

सोलापूर ब्रेकिंग! कॉपीमुक्त अभियानाची कडक अंमलबजावणी

  • सोलापूर :- फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये होणाऱ्या माध्यमिक इयत्ता 10 वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12 वी शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी दक्षता समितीची सभा जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा दक्षता समिती, सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांच्या उपस्थितीत आज दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, सात रस्ता, सोलापूर येथे पार पडली.   
  • सदर बैठकीमध्ये शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, सोलापूर तथा सचिव जिल्हा दक्षता समिती यांनी जिल्ह्यामध्ये इयत्ता 12 वीची 121 व इयत्ता 10 वीची 184 परीक्षा केंद्रे आहेत. याबाबत माहिती दिली. सदर परीक्षेसाठी जिल्ह्यात इयत्ता 12 वी साठी 11 वी व इयत्ता 10 वीसाठी 15 परिरक्षक केंद्र (कस्टडी) आहेत. त्यावर गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या परीक्षांसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांनी दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या राज्यस्तरीय व्ही.सी.मध्ये 1982 च्या कायद्याची कॉपीमुक्त अभियानाची कडक अंमलबजावणी करणेसाठी सर्व ती आवश्यक यंत्रणेचा वापर करावा. व याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत.
  • इयत्ता 12 वीची परीक्षा दिनांक 11 फेब्रुवारी 2025 ते 18 मार्च 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे. तसेच इयत्ता 10 वीची परीक्षा दिनांक 21 फेब्रुवारी 2025 ते 17 मार्च 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे.
  • इयत्ता 12 वीसाठी 55 हजार 879 व इयत्ता 10 वीसाठी 65 हजार 585 इतके विद्यार्थी प्रविष्ठ होत आहेत. सदर परीक्षा केंद्रांसाठी केंद्रसंचालक नियुक्ती करण्यात आलेले असून जिल्ह्यात इयत्ता 12 वीसाठी 34 व इयत्ता 10 वीसाठी 47 संवेदनशील केंद्रे आहेत अशी माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, सोलापूर यांनी बैठकीमध्ये दिली. या परिक्षा केंद्रावर विशेष पोलीस बंदोबस्त व बैठे पथक नेमण्यात आलेले आहे. या परिसरात 144 कलम लागू करणेबाबत जिल्हाधिकारी यांनी पोलीस आयुक्त शहर व पोलीस अधीक्षक, ग्रामीणच्या अधिकाऱ्यांना सुचना दिल्या. संवेदनशील केंद्रावर व ज्याठिकाणी मास कॉपी चालते त्याठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून व्हिडीओग्राफीसाठी व्हिडीओग्राफर उपलब्ध करून देण्यात येतील असे सांगितले.

Related Articles

Back to top button