महाराष्ट्र
धनंजय मुंडे यांची प्रॉपर्टी किती? करुणा मुंडे यांनी आकडाच सांगितला
- मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करत न्यायालयात गेलेल्या करुणा शर्मा यांना मोठे यश आलेले आहे. शर्मा यांनी केलेले आरोप वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयाने अंशतः मान्य केले आहेत.
- धनंजय मुंडे यांची पाचशे कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे. त्यांचे वार्षिक उत्पन्न ६५ कोटी रुपये आहे. आधी राजश्री धनंजय मुंडे यांच्या नावावर संपत्ती नव्हती. पण जेव्हापासून माझे आणि धनंजय यांचे भांडण सुरू झाले, तेव्हा त्यांनी राजश्री यांच्या नावावर संपत्ती केली. राजश्री यांच्या नावावर संपत्ती करताना त्यांनी मला किंवा आमच्या मुलांना अजिबात विचारले नव्हते. आमच्या नावावर त्यांची एकही रुपयांची प्रॉपर्टी नाही, असे करुणा म्हणाल्या. आता धनंजय मुंडेंच्या संपूर्ण संपत्तीवर दावा करणार असल्याचे करुणा शर्मा यांनी सांगितले आहे.