क्राईम
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट…!

- इंदूर येथील राजा रघुवंशी हत्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. राजाची पत्नी सोनम रघुवंशीचा पहिला जबाब समोर आला आहे. सोनमने पोलिसांसमोर सरेंडर केल्यानंतर काही खुलासे केले आहेत. ते तर अधिक धक्कादायक आहेत. तिने पोलिसांना सांगितले की, आपला पती राजाची हत्या अज्ञात लोकांनी केली आहे.
- शिवाय पतीची हत्या केल्यानंतर अज्ञात लोकांनी मला पळवून नेले. त्यानंतर एका खोलीत बंद करून ठेवले, असा दावा सोनमने पोलिसांसमोर केला आहे. त्यानंतर तिला एका गाडीत बसवून ढाब्यावर सोडून दिले. तिच्या या जबाबाने या प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. सोनमला पोलिसांनी उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथून अटक केली आहे.
- सोनम रविवारी रात्री उत्तर प्रदेशातल्या एका ढाब्यावर पोहोचली होती. जिथे तिने ढाब्याच्या मालकाकडून मोबाईल घेऊन आपल्या भावाला फोन केला. त्यानंतर तिथे पोलिस आले. त्यांनी तिला अटक केली. सोनम सध्या गाझीपूरमध्ये असून पोलिस तिला न्यायालयात हजर करणार आहेत. त्यानंतर मेघालय पोलिस तिला घेऊन जातील. राजा रघुवंशी हत्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत राज कुशवाह, विशाल उर्फ विक्की ठाकूर, आकाश राजपूत यांना अटक केली आहे. राज आणि विशाल इंदूरचे तर आकाश ललितपूर (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी आहेत. चौथा आरोपी आज सागर जिल्ह्यातील बीना येथून पकडला गेला आहे.
- राजा रघुवंशी हत्येप्रकरणी सोनम ही प्रमुख आरोपी आहे. सर्व हत्येचा कट तिनेच रचल्याचा तिच्यावर संशय आहे. त्यात तिने आता पलटी मारली आहे. आपण ही हत्या केली नसल्याचा तिचा दावा आहे. पण मेघालयच्या मंत्र्यांनी पोलिस तपासाच्या अधारे हा लव्ह ट्रँगल असल्याचे सांगितले आहे. शिवाय या हत्येची मुख्य सुत्रधार सोनमच असल्याचा दावा मेघालय पर्यटनमंत्र्यांनी केला आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी किचकट होण्याची दाट शक्यता आहे. सोनम खरं बोलत आहे की खोटं याचा शोध आता पोलिसांना घ्यावा लागणार आहे.



