क्राईम

लहान बहिणीसमोरच पीडितेवर अत्याचार

  • राज्यात बदलापूर येथील एका शाळेत दोन मुलींवर अत्याचार झाल्याप्रकरणी जनक्षोभ उसळला होता. ही घटना ताजी असतांना आता जळगावमध्ये मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे. एक बारा वर्षांची अल्पवयीन मुलगी ही शेतातून आपल्या लहान बहिणीसोबत घरी जात होती. यावेळी आरोपींनी या मुलीला शेतात जबरदस्तीने ओढून नेत तिच्यावर बलात्कार केला. यानंतर मुलीच्या लहान बहिणीसमोरच दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली.
    ही घटना चोपडा तालुक्यात काल घडली. आरोपीने आधी तिच्यावर बलात्कार केला व त्यानंतर डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
    याबाबत मिळालेल्या माहितीनुसार खून झालेली अल्पवयीन मुलगी ही काल शेतात कामासाठी गेली होती. यावेळी तिच्यासोबत तिची लहान बहीणदेखील होती. ही मुलगी संध्याकाळी शेतातून काम संपवून घरी जात होती. 
  • यावेळी आरोपीने तिचा हात जबरदस्तीने ओढून जवळच्या शेतात नेले. याठिकाणी त्याने तिच्यावर अत्याचार केला. तसेच या घटनेची माहिती तिने कुणाला देऊ नये यासाठी त्याने जवळच असलेल्या दगडाने मुलीचे डोके ठेचून तिची निर्घृण हत्या केली. यावेळी पीडित मुलीची लहान बहीण समोर होती. 
    तिच्या समोरच नराधमाने हे कृत्य केले. यानंतर लहान बहिणीने गावात जाऊन ही घटना ग्रामस्थांना सांगितली. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान आरोपी फरार होण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Related Articles

Back to top button