हवामान
खुशखबर! यंदा वेळेआधीच केरळमध्ये मान्सून धडकणार

- उन्हाळ्याच्या कडाक्यातही राज्यात काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे तापमानाचा पारा खाली आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, अंदमान निकोबार बेटावरून मान्सूनबाबत आनंदाची बातमी समोर आली. वेळेआधीच मोसमी पाऊस निकोबार बेटांवर दाखल होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. केरळमध्ये एक जूनला तर मुंबईत जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
- भारतीय हवामान खात्याने यंदा १०५ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. केरळमध्ये एक जूनला तर मुंबईसह महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ८ जूनपर्यंत मान्सून धडकण्याची शक्यता आहे. एल निनोचा प्रभाव नसल्याने अनुकूल वातावरणामुळे पावसाचे प्रमाण चांगले राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याअखेरीस मान्सूनपूर्व वातावरण तयार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कमी दाबाचा पट्टा लवकर तयार होईल. त्यामुळे मान्सूनच्या प्रगतीला वेग येऊ शकतो. यंदा महाराष्ट्रात कोकण, मराठवाडा आणि विदर्भात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. तर, मध्य महाराष्ट्रात सामान्य पाऊस पडेल, असा अंदाज आहे.



