क्राईम
कामासाठी मुंबईत आलेल्या तरुणीची अत्याचार करुन हत्या

- फाशीची शिक्षा सुनावलेल्या चंद्रभान सानप याची मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. त्याच्यावर मुंबईतील 23 वर्षीय तांत्रिक तज्ज्ञ इस्तेर अनुह्यावरील दुष्कृत्य आणि हत्येचा सानपवर आरोप होता. सानप याला 2015 मध्ये एका विशेष महिला कोर्टाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. यानंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयात फाशीच्या शिक्षेला आव्हान दिले होते.
- मात्र उच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली होती. यानंतर सानपने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले. सर्वोच्च न्यायालयाने फिर्यादीच्या तथ्यांमध्ये कमतरता असल्याचे सांगत आरोपी सानपची निर्दोष मुक्तता केली.
- पाच जानेवारी 2014 रोजी पीडिता आंध्रप्रदेशात आपल्या आई-वडिलांना भेटल्यानंतर पहाटे पाच वाजता मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचली होती. पहाटेची वेळ होती. यावेळी स्टेशनबाहेर तिला रिक्षाचालक सानप भेटला. सानपने पीडिताला तीनशे रुपयात आपल्या दुचाकीने अंधेरीतील YWCA वसतिगृहात पोहोचविण्याची ऑफर दिली.
- पीडितेनेही ते मान्य केले. मात्र रस्त्यात सानप तिला कांजुरमार्गजवळ एका निर्जन स्थळी घेऊन गेला. त्याने येथेच तिच्यावर बलात्कार केला आणि तिची हत्या केली, असे फिर्यादी पक्षाकडून सांगण्यात आले. दरम्यान तपासात त्रुटी आढळून आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने सानप याची आज निर्दोष मुक्तता केली.