राजकीय

ब्रेकिंग! रणनितीकार प्रशांत किशोर यांना अटक

  • प्रसिद्ध निवडणूक विश्लेषक प्रशांत किशोर यांना अटक झाली आहे. किशोर हे राजकीय रणनितीकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी आतापर्यंत देशातील प्रमुख पक्षांसोबत काम केले आहे. त्यांच्यासाठी रणनितीची आखणी केली आहे. किशोर हे गांधी मुर्ती येथे आमरण उपोषणाला बसले होते. बिहार लोकसेवा आयोग परीक्षा रद्द करावी, ही त्यांची मागणी आहे. पहाटे चारच्या सुमारास बिहार पोलिसांनी त्यांनी ताब्यात घेतले. पोलीस त्यांना रुग्णवाहिकेत घालून AIIMS रुग्णालयात घेऊन गेले.
  • किशोर हे बिहारचे लोक आणि विद्यार्थ्यांसाठी लढत होते. सरकार या एकतेला घाबरली. त्यांच्याविरोधात शारीरिक हिंसा निंदनीय आहे, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. या झडपेनंतर पोलिसांनी किशोर यांना AIIMS मधून हलवले आहे. ते त्यांना नौबतपूर येथे घेऊन चालले आहेत. किशोर यांच्या समर्थकांचा गोंधळ पाहून प्रशासनाने हे पाऊल उचलले. मिळालेल्या माहितीनुसार, किशोर यांनी कुठलेही उपचार करुन घेण्यास नकार दिला आहे. त्यांनी रुग्णालयातही आपण उपोषण आंदोलन कायम ठेवले आहे. पटना पोलीस आणि किशोर यांच्या समर्थकांमध्ये एम्सच्या बाहेर झडप झाली.

Related Articles

Back to top button