सोलापूर! काशी पिठाच्या जगद्गुरूंच्या हस्ते उद्या विविध कार्यक्रम
सोलापुरातील शेळगी येथील शौर्य बहुद्देशीय सामाजिक संस्था यांच्यावतीने आयोजित काशी पिठाचे जगद्गुरु रक्तदान शिबिरात श्री. श्री. श्री. १००८ डॉ मल्लिकार्जुन विश्र्वाराध्य शिवाचार्य महास्वामिजिंच्या अमृतहस्ते विविध कार्यक्रम होणार आहे.
रविवार 26 जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहर उत्तर मतदार संघातून निवडून आलेले विक्रमी आमदार विजयकुमार देशमुख, आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल दैनिक संचारचे उपसंपादक संतोष चितापुरे, काशी पिठाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल डॉ. शैलेश पाटील तसेच शेळगीतील राजशेखर नागशेट्टी यांची पीएसआयपदी निवड झाल्याबद्दल या सर्वांचा काशी पिठाच्या जगद्गुरूंच्या हस्ते सत्कार होणार आहे. हा सोहळा 26 जानेवारी रोजी सकाळी साडे 11 वाजता होणार आहे. याशिवाय प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.