सोलापूर

खुशखबर! सोलापूर ते गोवा विमानसेवा आजपासून सुरू

  • सोलापूरकरांसाठी खुशखबर आहे. अखेर सोलापूर विमानतळावरुन थेट गोव्याला जाणे शक्य होणार आहे. सोलापूर-गोवा विमानसेवा आजपासून सुरू झाली आहे. प्रदीर्घ काळानंतर अखेर सोलापूरकरांना विमानाने गोवा गाठता येणार आहे.
  • होटगी येथील सोलापूर विमानतळावरून आज सोलापूर – गोवा आजपासून होणार सेवा सुरू झाली. केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे.
  • कसा असेल प्रवास..
  • सोमवार ते शुक्रवार : गोवा येथून सकाळी 7.20 वाजता सोलापूरसाठी विमान उड्डाण घेईल. त्यानंतर 8.30 वाजता सोलापूर विमानतळावर विमान लँड होईल. सकाळी 8.50 ला सोलापूरहून विमान गोव्यासाठी उड्डाण घेईल. 10.15 वाजता गोवा विमानतळावर विमान उतरणार आहे. सोमवार ते शुक्रवारसाठी असे वेळापत्रक असणार आहे.
  • शनिवार व रविवार : गोवा येथून सायंकाळी 4.05 वाजता सोलापूरसाठी विमान उड्डाण घेईल. 5.10 वाजता सोलापुरात विमान उतरणार आहे. त्यानंतर सायंकाळी 5.35 वाजता सोलापुरातून गोव्यासाठी विमान उड्डाण घेईल. 6.50 ला गोव्यात विमान लँड होईल.
  • सोलापूर ते गोवा या 409 किलोमीटर अंतरासाठी विमान तिकीटाचा दर साडे तीन हजार ते पाच हजार रुपये दरम्यान असेल, अशी माहिती आहे.

Related Articles

Back to top button