नवीन वर्षात रॉयल एनफिल्डचा धमाका

बुलेटप्रेमींना एक खुशखबर आहे. रॉयल एनफिल्डने स्क्रॅमचे अपग्रेडेड व्हर्जन भारतीय बाजारात लॉन्च केले आहे. स्क्रॅम ४४० असे या बाईकला नाव देण्यात आले असून गेल्या वर्षी मोटोव्हर्समध्ये त्याचे प्रथम प्रदर्शन करण्यात आले होते.
रॉयल एनफिल्ड स्क्रॅम ४४० ची किंमत ट्रेल व्हेरियंटची किंमत २.०८ लाख रुपये आहे. तर फोर्स ट्रिमची किंमत २.१५ लाख रुपये आहे. दोन्ही किंमती एक्स-शोरूम आहेत. ट्रेल व्हेरियंट ब्लू आणि ग्रीन रंगात तर फोर्स व्हेरियंट ब्लू, ग्रीन आणि टील रंगात उपलब्ध असेल.
स्क्रॅम ४४० मध्ये ४४३ सीसीचे अपग्रेडेड सिंगल सिलिंडर इंजिन आहे, जे एअर कूल्ड आहे. हे इंजिन २५.४ बीएचपी पॉवर आणि ३४ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. नव्या इंजिनमध्ये ३ एमएमचा मोठा बोअर देण्यात आला आहे, जो ४.५ टक्के अधिक पॉवर आणि ६.५ टक्के अधिक टॉर्क जनरेट करण्यास मदत करतो.
रॉयल एनफिल्ड स्क्रॅम ४४० मध्ये स्पोक्ड रिम्स तसेच अलॉय व्हील्स देण्यात येणार असल्याने ट्यूबलेस टायरचा पर्याय असेल. नवीन रॉयल एनफिल्ड बाईकमध्ये एक नवीन एलईडी हेडलॅम्प देण्यात आला आहे.