ब्रेकिंग! टीम इंडियासाठी खुशखबर

टीम इंडियाने रविवारी इंग्लंडविरूद्ध झालेल्या सामन्यात शंभर धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयासह टीम इंडिया गुणतालिकेत पु्न्हा एकदा अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. टीम इंडियाने आतापर्यंत खेळलेल्या सहा पैकी सहा सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी प्रबळ दावेदार आहे.
तर दुसरीकडे सहा पैकी एक सामना जिंकणारा इंग्लंडचा संघ वर्ल्डकप स्पर्धेच्या सेमीफायनलमधून बाहेर पडला आहे. दरम्यान टीम इंडियाचा आनंद द्विगुणित करणारी बातमी समोर आली आहे.
टीम इंडियातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या बांगलादेशविरूद्धच्या सामन्यातून दुखापतीमुळे बाहेर झाला होता. दुखापतीमुळे न्यूझीलंड आणि इंग्लंडविरूद्धच्या सामन्यातून त्याला बाहेर राहावे लागले आहे.
दरम्यान हार्दिक सेमी फायनलमध्ये खेळताना दिसून येऊ शकतो. सध्या त्याच्या दुखापतीवर उपचार सुरु आहेत. हार्दिकने नेट सेशनमध्ये सहभाग घेतला होता. सध्या बीसीसीआयची मेडिकल टीम त्याच्यावर लक्ष ठेवून आहे.
हार्दिक सध्या बंगळुरुत आहे. त्याला प्रवास करण्याची अनुमती दिली गेली नाही. टीम इंडियाचा साखळी फेरीतील शेवटचा सामना नेदरलँडविरुद्ध होणार आहे. हा सामना बंगळुरुत होणार आहे. हार्दिक याच सामन्यावेळी टीम इंडियासोबत जोडला जाऊ शकतो. तो साखळी फेरीतील सामन्यांमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे. तो सेमीफायनलच्या