राजकीय

ब्रेकिंग! मशिदीतील मौलानांनी महाविकास आघाडीला मतदान देण्याचे फर्मान काढले व्हिडिओ व्हायरल

  1. विधासनभा निवडणुकीत स्वबळावर लढणाऱ्या मनसे पक्षाकडून दररोज सभांचा धडाका लावला जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सभांच्या माध्यमांतून सत्ताधारी आणि विरोधकांवर टीका करताना दिसत आहे. आज घाटकोपर येथील सभेत बोलताना राज यांनी पुढच्या दोन दिवसात पक्षाचा जाहीरनामा येणार असल्याची माहिती दिली. यावेळी राज यांनी मतदारांना एकदा संधी देऊन बघा. नालायक ठरलो तर परत येणार नाही. दुकान बंद करून टाकेल, अशी आपली भूमिका स्पष्ट केली.
  2. सध्याच्या राज्यातील परिस्थितीवर भाष्य करताना राज म्हणाले की, शेतकरी आत्महत्या करत आहेत, महिला असुरक्षित आहेत. 
  3. लहान मुलींवर बलात्कार होत आहेत. मनसेने बदलापूरचे प्रकरण बाहेर काढल्यानंतर ते जगासमोर आले. आपण कोणत्या वातावरणात जगतोय? कसल्या निवडणुका घेऊन बसलोय आपण? नुसतं उन्हातान्हात उभं राहतोय आणि पदरी काही पडत नाही. त्यामुळे तुमचा स्वाभिमानी कणा मतदानाच्या दिवशी जागृत राहिला पाहिजे. 
  4. एकदा राज ठाकरेला संधी देऊन बघा. नालायक ठरलो तर परत येणार नाही. दुकान बंद करून टाकेल. महाराष्ट्राचे जे गत वैभव होते ते परत मिळवून द्यायचे मला, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
  5. माझ्या हिंदु बांधवांनो पाठिशी ठामपणे उभं रहा, या शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढलायं. दरम्यान, मशिदीतील मौलवींकडून फतवा काढण्यात येत असल्याने राज ठाकरे यांनी मौलवींचा उल्लेख करीत मीही फतवा काढत असल्याचं घोषित केलंय. वरळी मतदारसंघातील मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ठाकरे बोलत होते. यावेळी विविध मुद्द्यांवरुन त्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
  6. राज ठाकरे म्हणाले, मशिदीतील मौलानांनी महाविकास आघाडीला मतदान देण्याचे फर्मान काढले आहेत. यासंदर्भातील व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहेत. मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीला मतदान करण्याचे फर्मान काढण्यात येत आहेत. आज राज ठाकरे फर्मान काढतोयं, माझ्या तमाम हिंदु बांधवांनो माझ्या पाठिशी ठामपणे उभे रहा, सत्ता हातात आल्यास पहिल्या 48 तासांत मशिदीवरील भोंगे नाही उतरवले तर राजकारण सांगणार नाही, अशी घोषणा राज यांनी केली.

Related Articles

Back to top button