राजकीय

ब्रेकिंग! मुख्यमंत्री शिंदेंना तगडा झटका

सध्या विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा धुराळा उडू लागला आहे. स्टार प्रचारक आणि नेत्यांच्या सभांनी राजकारण तापू लागले आहे. तर दुसरीकडे फोडाफोडीचे राजकारणही जोरात सुरू आहे. नेत्यांचे इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरू आहे. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का देणारी बातमी आली आहे.

धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात शिंदे गटाला तगडा झटका बसला आहे. माजी नगराध्यक्ष सुवर्णा मुंडे यांचे पती सागर मुंडे यांच्यासह आठ माजी नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घडामोडीने शिंदे गटाच्या स्थानिक संघटनेला धक्का बसला आहे.

विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाने आयात केलेल्या उमेदवाराला तिकीट दिल्याने नाराजी उफाळून आली. त्याची परिणती पुढे पक्षांतरात झाली. या घडामोडीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव जिल्ह्यात येत आहेत. त्याआधीच ही धक्का देणारी घडामोड घडली आहे.

यावेळी सागर मुंडे यांच्या बरोबरच माजी नगरसेवक नंदू हौसलमल, बाबूभाई बागरेचा, शंकर वाघमारे, शफीक काझी, मनीष पुरी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि समर्थकांनी ठाकरे गटात प्रवेश केला. मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघातही शिंदे गटाला तगडा झटका बसला आहे. शिवसेनेच्या उपविभाग प्रमुख रेणुका तांबे, शाखाप्रमुख संतोष शिंदे, श्रीकांत जावळे, अन्वर दुर्रानी यांनी कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश केला.

Related Articles

Back to top button