राजकीय
प्रमोद महाजनांच्या हत्येसंदर्भात खळबळजनक दावा समोर
- माजी केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन यांची 2006 साली त्यांचे बंधू प्रवीण महाजन यांनी गोळ्या घालून हत्या केली. महाजन यांची हत्या गृहकलहामधूनच झाल्याची त्यावेळी मोठ्या प्रमाणात चर्चा होती. आता या घटनेला 18 वर्ष झाली. पण प्रमोद महाजनांचे बंधू प्रकाश महाजन आणि त्यांची लेक पूनम महाजन यांनी केलेल्या वक्तव्याने हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
- दोघांच्या खळबळजनक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अठरा वर्षानंतर प्रमोद महाजन यांच्या मृत्यूच्या कारणाबाबत चर्चा सुरू झाली.
- माझ्या वडिलांची हत्या झाली तेव्हा हा कौटुंबिक विषय असल्याची चर्चा होती. मात्र, प्रमोद महाजन यांची राजकीय कारकीर्द पुढे जाऊ नये, यासाठी षडयंत्र होते.
- त्यांना रोखण्यासाठी संपवण्यात आले. एवढेच नाही तर लोकसभेच्या वेळी माझे तिकीटही कापण्यात आले. तेही एक मोठं षडयंत्र होते. पण हे षडयंत्र कोणी रचले? हे असे कोणी का केले ? याच्या शोधात मी बसत नाही. मात्र, हे षडयंत्र आज नाही तर उद्या एक दिवस बाहेर येईल, असेही पूनम महाजन यांनी म्हटले आहे.