सोलापूर

…तर प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांचे घर फोडू

दक्षिण सोलापूरमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेतील ( ठाकरे गट ) वातावरण चिघळले आहे. काँग्रेस आणि शिवसेनेतील वाद बाचाबाचीवरून फोडाफोडीवर गेला आहे. शिवसेना उपनेते शरद कोळी यांनी खासदार प्रणिती शिंदे यांची गाडी फोडण्याचे वक्तव्य केले होते. तर युवक काँग्रेसचे नेते गणेश डोंगरे यांनी थेट कोळी यांच्या कार्यालयाबाहेर जेव्हा त्यांची गाडी लागेल, तेव्हा ती फोडली जाईल, अशी ‘वॉर्निंग’ दिली होती. यात आता शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखांनी थेट प्रणिती शिंदे यांचे घर फोडण्याचा इशारा दिला आहे.

शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील यांनी प्रणिती शिंदे यांचे घर फोडण्याचा इशारा दिला आहे. कोळी यांच्या कार्यालयासमोर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने आणि काही भाड्याने आलेल्या महिलांनी नाटक करण्याचा प्रयत्न केला. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो.

कारण, अमर पाटील यांना उमेदवारी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या लोकांनी जाहीर केली आहे. हे प्रणिती शिंदे यांना माहिती नव्हते का? महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाला, तेव्हा प्रणिती कुठे होत्या? कोळी यांची गाडी फोडल्यास प्रणिती आणि सुशीलकुमार शिंदे यांचे घर फोडू, असा इशारा पाटील यांनी दिला आहे.

Related Articles

Back to top button