क्राईम
ब्रेकिंग! तानाजी सावंत यांच्या पुतण्याच्या घराबाहेर गोळीबार

- राज्याचे आरोग्यमंत्री आणि शिंदे गटाचे नेते डॉ. तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. काल रात्री दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभुमीवर ही घटना घडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे.
काल रात्री साडेबारा वाजल्यानंतर धनंजय सावंत यांच्या सोनारी परिसरातील बंगल्यासमोर दोन अज्ञात व्यक्तींनी बंदुकीतून तीन फायर केले. यावेळी धनंजय सावंत घरातच होते. सुरक्षा रक्षकही बाहेर होते. मात्र गोळीबार करणाऱ्या व्यक्तींची ओळख पटलेली नाही. गोळीबार करणारे कोण होते? गोळीबार करण्यामागचे कारण काय? अशी चर्चा सुरू आहे.
गोळीबार करणारे लागलीच फरार झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. बंगल्याबाहेर असलेले सुरक्षारक्षकही सुखरुप आहेत. गोळीबाराचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या घटनेनंतर त्यांनी लागलीच पोलीस स्टेशन गाठले. येथे रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.