देश - विदेश

ब्रेकिंग! मोदींचा मास्टरस्ट्रोक

  • भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत ही मोठी घोषणा केली आहे. आडवाणी हे भाजपचे वरिष्ठ नेते आहेत. तसेच प्रभू श्रीराम मंदिराच्या आंदोलनातील सर्वात प्रमुख चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे.
आडवाणींना भारतरत्न देऊन एकप्रकारे केंद्र सरकारने आडवाणींकडे दुर्लक्ष केले गेले किंवा आडवाणींविषयी या सरकारला काही आस्था नाही, असा जो प्रचार विरोधकांनी केला होता, त्याला आत भाजपाने पूर्णविराम दिला आहे.
मोदी यांनी भारतरत्न पुरस्काराची घोषणा करताना म्हटले आहे की, मला कळवायला अतिशय आनंद होत आहे की लालकृष्ण आडवाणींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यासंदर्भात मी त्यांच्याशीही बोललो आहे. हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.
ते आपल्या काळातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक आहेत. त्यांनी भारताच्या विकासात अविस्मरणीय योगदान दिले आहे. तळागाळात काम करण्यापासून ते उपपंतप्रधान म्हणून देशाची सेवा करण्यापर्यंत त्यांचे समर्पण महत्त्वाचे आहे. त्यांनी गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणूनही आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.

Related Articles

Back to top button