मनोरंजन

ब्रेकिंग! पूनम पांडे जिवंत! स्वत:च शेअर केला व्हिडीओ

  • अभिनेत्री पूनम पांडेचे गर्भाशयाच्या कर्करोगाने निधन झाल्याच्या बातमीने मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली. पण पूनमने स्वत: व्हिडीओ शेअर करत तिने निधनाची पोस्ट का शेअर केली, यामागील कारण सांगितले आहे.
तुमच्या सर्वांसोबत काहीतरी महत्त्वाचे शेअर करायला मी समोर आली आहे.  मी जिवंत आहे. गर्भाशयाच्या कर्करोगाने माझा मृत्यू झाला नाही, परंतु दुर्दैवाने, या रोगाचा सामना कसा करावा याबद्दल ज्ञानाच्या अभावामुळे हजारो महिलांचे प्राण गेले आहेत. इतर काही कर्करोगांप्रमाणे, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग पूर्णपणे टाळता येण्याजोगा आहे.
मी इथे तुमच्या समोर या आजाराविषयी थोडक्यात माहिती द्यायला आली आहे, असे म्हणत पूनमने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शन दिले की, हो मी माझी माझ्या मृत्यूची बातमी खोटी दिली, हो हे अतिशय चुकीचे आहे, पण माझ्या मृत्यूची बातमी ऐकताच अचानक सर्वजण अचानक गर्भाशयाच्या कॅन्सरवर बोलू लागले आणि हे होणे गरजेचे होते.
मी इथे तुमच्या समोर या आजाराविषयी थोडक्यात माहिती द्यायला आली आहे. दरम्यान सध्या पूनमचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी प्रचंड संतापले असून तिच्यावर टीका होत आहे.

Related Articles

Back to top button