सोलापूर
सोलापुरातील कन्ना चौकात राडा

सोलापूर (प्रतिनिधी) जुन्या अज्ञात कारणावरून तरुणास लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १ फेब्रुवारी रोजी कन्ना चौक येथील नागेश हॉटेल समोर घडली.याप्रकरणी येल्लोभाई अंबादास शिंदे (वय-२५,रा.भुलाबाई चौक,वडार गल्ली) यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
त्यांच्या फिर्यादीवरून प्रेम मिरेकर व नंदू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांचे पती वरील ठिकाणी चहा पित असताना वरील संशयित आरोपी यांनी जुन्या कुठल्यातरी अज्ञात कारणावरून फिर्यादी यांच्या पतीला लोखंडी रॉडने गुडघ्यावर मारून जखमी केले. तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण करून निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपास पोलीस नाईक चव्हाण हे करीत आहेत.