- सोलापूर (प्रतिनिधी) किरकोळ कारणावरून एकास शिवीगाळ करत दमदाटी करून मारहाण केल्याप्रकरणी एका जणाविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १८ जानेवारी रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास मंगळवार बाजार येथे घडली. याप्रकरणी गुरुदेवी काशिनाथ काळे (वय-३२, रा. मुकुंद नगर, न्यू बुधवार पेठ) यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून सागर दत्तात्रय वडतिले (रा.मराठा वस्ती) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
- या घटनेची हकीकत अशी की, फिर्यादी काम करत असलेल्या रुबी चायनीज दुकानात येऊन फिर्यादीच्या ओळखीच्या लोकांनी मी फुकट चायनीज खाऊन बिल न देता निघून जातो असे का सांगितले म्हणून फिर्यादी यांच्या मालकाच्या अंगावर येऊन त्यांना हाताने मारहाण करत शिवीगाळ करून दमदाटी केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रुपनर हे करीत आहेत.
सोलापूर ब्रेकिंग! किरकोळ कारणावरून…
