क्राईम
सोशल मिडियावर सुत जुळले पुढे…प्रेमाच्या नावाखाली शरीरसंबंध…

- सोशल मिडियाच्या आहारी गेलेले तरुण-तरुणी काय करतीन नेम नाही, पण सोळावे वर्ष सरल्यानंतर सतराव्या वर्षीच हे मुले नको त्या गोष्टी करत असतील तर ही गंभीर बाब आहे. नको त्या वयात केलेल्या गोष्टी किती गंभीर असू शकतात याचे उदाहरण समोर आले आहे.
- गुजरातमधील सुरतच्या एका मुलाचे एका मुलीशी सुत जुळले अन् प्रकरण लैंगिक संबंधापर्यंत पोहचले.
- या प्रकरणी पोलिसांनी एका 17 वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे. या मुलाने इन्स्टाग्रामवर 16 वर्षीय मुलीशी मैत्री करून संबंध प्रस्थापित केल्यानंतर संबंधित मुलगी गर्भवती झाली. यानंतर तिचा गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकून देण्यात आले होते. पक्षी घिरट्या घालू लागल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
- पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, मुलीची इन्स्टाग्रामवर एका 17 वर्षीय मुलाशी मैत्री झाली होती. मुलगा सुरतच्या पांडेसरा येथे भाड्याच्या घरात राहत होता आणि त्यांच्यात शारीरिक संबंध होते, त्यामुळे मुलगी गरोदर राहिली. पोलिसांनी सांगितले की, मुलीच्या गरोदरपणाची माहिती मिळताच मुलगा उत्तर प्रदेश आणि नंतर मुंबईला पळून गेला. पोलिस अधिकाऱ्याने मुलीच्या हवाल्याने सांगितले की, मुंबईतील मुलाने तिला गर्भधारणा संपवण्यासाठी गोळ्यांचे पॅकेट पाठवले.
- तिने दोन गोळ्या घेतल्या आणि घरीच गर्भपात केला. नंतर गर्भ फेकून दिला.
- प्रेमाच्या नावाखाली शरीरसंबंध जर होत असतील तर प्रेमालाही बदनामी सहन करावी लागते, केवळ आकर्षणापोटी घडलेले असे हे प्रकरण. मुलीचे शरीरसंबंध मुलाशी आल्यानंतर ती गर्भवती राहिली. काही काळाने मुलाने तिला चक्क गर्भपातासाठी मुंबईहून गोळ्या दिल्या गेल्या होत्या. त्यानंतर मुलीचा घरीच गर्भपात झाला. मुलीने गर्भ नाल्याजवळ फेकून दिला. यानंतर या गोष्टीचा खुलासाही झाला.