क्राईम

धक्कादायक! अन्….तिच्या डोळ्या देखत तिचं बाळ चाकाखाली चिरडलं

सोलापूर (प्रतिनिधी) मध्यप्रदेश मधील खांडवा या जिल्ह्यातून ऊसतोडी निमित्त सोलापूर जिल्ह्यात आलेल्या मुकेश काजल या दापत्याच्या जीवनात गुरुवारी हृदय पिळवटुन टाकणारी अघटीत घटना घडली.
ट्रॅक्टर मधून बसून जात असताना ट्रॅक्टर आदळल्याने महिलेच्या हातातील बाळ खाली रस्त्यावर पडलं आणि पाठीमागून आलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मागच्या चाकात येऊन तिच्या डोळ्यादेखत ते चिरडले गेले. ही हदय दावक घटना अक्कलकोट तालुक्यातील म्हैसलगी येथे घडली. 
गुरुवारी दुपारी मुकेश काजल हे आपल्या पत्नी समवेत सकाळी नऊच्या सुमारास म्हैसलगी येथील बिराजदार यांच्या रानात ऊस तोडीसाठी ट्रॅक्टरच्या ट्रॉली मागे बसून जात असताना अचानक खड्ड्यामध्ये ट्रॅक्टरगाडी आढळल्याने ट्रॉली आढळल्याने त्या दापत्याच्या हातामधून ते बालक खाली पडून पाठीमागून येणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे मागील चाक तोंडावरच गेल्याने ते बाळ जागीच चिरडले‌.
बेशुद्ध अवस्थेत त्यास उपचाराकरिता वडिलांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले खरे परंतु वाटेतच त्या बाळाने प्राण सोडला होता‌. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकी झाली आहे.

Related Articles

Back to top button