ब्रेकिंग! लाडक्या बहिणींसाठी आनंदवार्ता

सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केलेली लाडकी बहीण योजना सध्या चर्चेचा विषय बनली आहे. जुलै महिन्यात सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात. दरम्यान आता जानेवारीचा हप्ता कधी जमा करण्यात येणार? असा प्रश्न उपस्थितीत होत असतानाच याबाबतची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून देण्यात आली आहे. तटकरे यांनी गुरुवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याबाबतची माहिती दिली आहे.
तटकरे म्हणाल्या की, 26 जानेवारीच्या आधी जानेवारी महिन्याचा लाभ मिळेल असा प्रयत्न सुरू आहे. यासाठी 3,690 कोटींचा निधी आम्हाला मिळणार आहे. अर्थसंकल्पाच्यावेळी देखील महिलांना लाभ कसा मिळेल? याची तरतूद आम्ही करणार आहोत. आम्ही फेब्रुवारीचे नियोजन सुद्धा करत आहोत. लाडकी बहीण योजनेचा लाभ आम्ही दोन कोटी 46 लाख महिलांना दिला. काही महिलांबाबत तक्रार आली होती. ड्युप्लिकेशन झालेल्या केसेस कमी होत्या. त्यामुळे फार काही फरक पडेल असे मला वाटत नाही. या महिन्यातील आकडा आधीसारखाच राहील.