ब्रेकिंग! ‘त्या’ लाडक्या बहिणींना जानेवारीचे पैसे भेटणार नाहीत

राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. दरम्यान या योजनेबाबत मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून मोठी अपडेट देण्यात आली आहे.
डिसेंबरचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. आता 26 जानेवारीपर्यंत महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता देखील मिळणार आहे. येत्या तीन ते चार दिवसांमध्ये पैसे बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल. तसेच ही योजना सुरूच राहणार आहे, असे तटकरे यांनी म्हटले आहे.
ज्या महिलांनी वेगवेगळ्या योजनांसहित या योजनेचा लाभ घेतला आहे, अशा महिला या योजनेतून कमी होतील. ज्या महिलांचे या योजनेंतर्गत एकापेक्षा अधिक खाती आहेत, त्या महिलांना कमी केले जाईल. जास्त काही फरक पडणार नाही. मात्र एखादा टक्का महिला योजनेतून कमी होतील, असे तटकरे यांनी सांगितले.



