क्राईम
नातेवाईकांसोबत वाद झाला अन् वैर बळावले

सध्या बीडमधील वाढलेली गुन्हेगारी चर्चेचा विषय आहे. बीडमधील गुन्हेगारी रोखण्यात पोलीस प्रशासन सपशेल फेल झाल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. यातच आता बीड पुन्हा दुहेरी हत्येने हादरले आहे. दोन सख्ख्या भावांचा हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. आष्टी तालुक्यातील वाहिरा परिसरात ही घटना घडली आहे.
अजय भोसले (30 वर्ष) आणि भरत भोसले (32 वर्ष) अशी हत्या झालेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत. दरम्यान नातेवाईकानेच दोघांची हत्या झाल्याची माहिती मिळत आहेत. अजय आणि भरत यांचा नातेवाईकांसोबत जुना वाद होता. याच वादातून रात्री निर्घृणपणे या दोघांची हत्या झाली.
दोघे भाऊ आष्टी तालुक्यातील हातवळण या गावचे आहेत. याच गावापासून पाच किलोमीटर अंतरावर वाहिरा गावच्या परिसरात या दोघांची हत्या झाली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित चार जणांना ताब्यात घेतले आहे.