सध्या राज्यभर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत आहे. या प्रकरणामुळे मंत्री धनंजय मुंडेंवरही गंभीर आरोप करण्यात येत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशातच आता संपूर्ण बीड जिल्हा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. देशमुख हत्या प्रकरणाच्या वादानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा निलंबित तालुकाध्यक्ष विष्णू चाटे यांच्यामुळे जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. देशमुख हत्या प्रकरणांमध्ये आरोपी म्हणून चाटे यांचे नाव आल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती.
यामुळेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारणी बरखास्त केली आहे. महत्त्वाचे म्हणजे यापुढे तालुका अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्या चारित्र्याची पडताळणी करूनच नेमणुका कराव्या, अशा सूचना बीड राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना देण्यात आल्या आहेत. जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्षांची निवड होईपर्यंत जिल्हाध्यक्ष म्हणून चव्हाण हेच काम पाहतील, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कळवण्यात आले आहे.
दरम्यान, एकीकडे देशमुख हत्या प्रकरणात मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. मुंडेंमुळेच वाल्मिक कराडसारख्या गुन्हेगारांना अभय मिळत असल्याचा आरोप करत निष्पक्ष चौकशीसाठी मुंडेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधक करत आहेत. अशातच आता बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त झाल्याने मुंडेंसाठी