मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार असल्याचा ठपका असलेला संशयित आरोपी वाल्मिक कराडबाबत नवनवीन खुलासे समोर येत आहेत. अशातच कराडवर मकोका आणि देशमुख हत्येच्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवल्यानंतर त्याला बीड कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी एक नवीन खुलासा समोर आला आहे.
बीड कोर्टात आज एसआयटीचे प्रमुख व तपास अधिकारी अनिल गुजर यांनी कराडचा देशमुख खून प्रकरणात सहभाग असल्याचा पुरावा न्यायालयाला दिला आहे. कारण, ज्या दिवशी सरपंच देशमुख यांची हत्या झाली, अगदी त्याच दिवशी दुपारी या खून प्रकरणातील आरोपी आणि कराड यांचे बोलणे झाले असल्याचे कॉल रेकॉर्ड आम्हाला मिळाले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
याशिवाय देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आणि वाल्मिक यांच्यात तब्ब्ल दहा मिनिटांचे बोलणे झाला असल्याचा दावा गुजर यांनी न्यायालयात केला आहे. त्यामुळे आता देशमुख खून प्रकरणात कराड पुरता अडकल्याचे बोलले जात आहे.