मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याच्या कोठडीबाबत आज केज कोर्टात सुनावणी पार पडली. वाल्मिकला खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान हत्येच्या गुन्ह्यात वाल्मिकचा ताबा आपल्याला मिळावा अशी मागणी एसआयटीने कोर्टात केली.
विशेष म्हणजे कलम 302 प्रकरणात वाल्मिक याला मोक्का गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर केज कोर्टाने वाल्मिक याचा एसआयटीकडे ताबा देण्याची मागणी मान्य केली. त्यामुळे वाल्मिक याच्यासाठी हा तगडा झटका आहे.
हत्येच्या गुन्ह्यात सीआयडीने त्याच्यावर प्रोडक्शन वॉरंट जारी केले आणि कोर्टाने ते मंजूर केले. परिणामी सीआयडीकडे वाल्मिकचा ताबा मिळाला आहे. दरम्यान, देशमुख हत्या प्रकरणावर वाल्मिक याच्या पोलीस कोठडीसाठी उद्या त्याला पुन्हा कोर्टात हजर केले जाईल. यावेळी त्याच्या पोलीस कोठडीबाबत युक्तिवाद केला जाणार आहे.