बिजनेस

भारीच ! पेट्रोलवर नव्हे तर इथेनॉलवर धावणार बाईक

दिल्ली येथे इंडिया मोबिलिटी एक्स्पो 2024 सुरू होता. यादरम्यान, बाईक उत्पादक कंपनी बजाज ऑटोने त्यांच्या बहुप्रतिक्षित फ्लेक्स-इंधन मॉडेलवर आधारित Pulsar NS160 सादर केली आहे. याव्यतिरिक्त कंपनीने डोमिनार 400 चे फ्लेक्स-इंधन मॉडेल देखील प्रदर्शित केले आहे. म्हणजेच कंपनीची अपकमिंग बाईक पेट्रोलवर धावणार नाही तर फ्लेक्स-इंधनावर धावणार आहेत. यासाठी दोन्ही बाईकच्या इंजिनमध्ये बदल करण्यात आले आहेत. यानंतर ग्राहक इथेनॉल मिश्रित पेट्रोलवर ही बाईक चालवू शकतील.
Dominar 400 आता 27.5 टक्के इथेनॉल पेट्रोल मिश्रित इंधनावर धावणार आहे. Dominar E27.5 आधीच ब्राझीलसह 35 पेक्षा जास्त देशांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. मात्र बाईकच्या डिझाइनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
Pulsar NS160 ची सध्याची (एक्स-शोरूम) किंमत भारतात 1.37 लाख रुपये आहे. तर Dominar 400 ची किंमत 2.30 लाख रुपये आहे. या दोन्ही बाईक्स ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.

Related Articles

Back to top button