सोलापूर

सोलापूरकरांना खुशखबर!

  • सोलापूर शहराच्या वाहतूक समस्येवर कायमचा तोडगा काढण्यासाठी नियोजित असलेले शहरातील दोन्ही येथील उड्डाणपुल हे सोलापूरच्या विकासाचे अमूल्य दागिने ठरणार आहेत. हे प्रकल्प भारत सरकारचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा.श्री.नितीन गडकरी यांचा खास “ड्रीम प्रोजेक्ट” असून त्यांच्या कार्यकाळातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
  • विशेष बाब म्हणजे, सोलापूरच्या या दोन्ही उड्डाणपुलांचे डिझाईन एवढे उत्कृष्ट आणि वैज्ञानिकदृष्ट्या सुसंगत आहे की त्याचा आधार घेत NHAI ने छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर या शहरांमध्ये यशस्वीपणे उड्डाणपुलांची उभारणी केली आहे. मात्र, सोलापूरात विविध कारणांमुळे हा प्रकल्प काहीसा उशिराने पुढे सरकला असून त्यामुळे गडकरींना विशेष नाराजी वाटत आहे. त्यांच्या कार्यकाळातील हा सर्वाधिक विलंब झालेला प्रकल्प मानला जातो.
  • यावर आणखी सकारात्मक बाब म्हणजे या दोन्ही उड्डाणपुलांशी संबंधित असलेल्या सर्व न्यायालयीन याचिका – मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात निकाली काढण्यात आल्या आहेत. सध्या या प्रकल्पासंदर्भात कोणतीही न्यायालयीन अडचण नाही. त्यामुळे आता उड्डाणपुल उभारणीत कोणतीही कायदेशीर अडथळा राहिलेला नाही.
  • NHAI ने या प्रकल्पासाठी अचूक आणि वैज्ञानिकदृष्ट्या परिपूर्ण आराखडे तयार केले आहेत. केंद्र सरकार, महाराष्ट्र राज्य शासन आणि सोलापूर महानगरपालिका एकत्रितपणे भूसंपादनाच्या अंतिम टप्प्यावर पोहोचले आहेत. सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी स्वतः पुढाकार घेतला असून भूसंपादनाची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्यासाठी त्यांनी ॲक्शन मोडमध्ये काम सुरू केले आहे.
  • या प्रकल्पाला सोलापूरच्या सामान्य नागरिकांचा आणि व्यापाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा आहे. केवळ काही निवडक बाधित व्यापारी याला विरोध करत आहेत आणि त्यांचीच बाजू पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यापर्यंत चुकीच्या पद्धतीने पोहोचवली जात आहे, अशी खंत अनेकांनी व्यक्त केली आहे.
  • छत्रपती शिवाजी महाराज चौक हे सोलापूरमधील सर्वात मोठे ट्रॅफिक हॉटस्पॉट असून, तिथे होणाऱ्या जीवघेण्या अपघातांना आणि वाहतूक कोंडीला एकच उपाय आहे – उड्डाणपुल. ग्राउंड सर्व्हे आणि नागरिकांच्या अभिप्रायावरूनही हे स्पष्ट झाले आहे की, सोलापूरकरांना उड्डाणपुल हवा आहे – आणि तो तातडीने हवा आहे.
  • या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या नागरिकांना आता वाट पाहायची आहे ती भूसंपादन पूर्ण होऊन या दोन्ही ऐतिहासिक आणि अत्यावश्यक उड्डाणपुलांची प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची. सोलापूरच्या इतिहासात हा एक सुवर्णक्षण ठरणार आहे, ज्या दिवशी शहराच्या विकासाला खऱ्या अर्थाने गती मिळेल.
  • विजय कुंदन जाधव,
  • अध्यक्ष,
  • गिरीकर्णिका फाऊंडेशन.

Related Articles

Back to top button