क्राईम

ब्रेकिंग! ऐसा लगानेका अन् रात्रभर बांगो बांगो बांगो

  • सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यभरात संतापाची लाट आहे. दरम्यान काल धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. 
  • यावेळी भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला. यावेळी धस यांनी भरसभेत साठे नावाच्या व्यक्तीची एफआयआर दाखवली. 
  • केवळ मराठ्याचा असल्यामुळे बेदम मारले. ज्यांनी मारले, त्याच्यावर सात ते आठ गुन्हे दाखल आहेत, तरीही अजून परळीच्या पोलिसांनी अटक केली नाही, अशी खदखद धस यांनी बोलून दाखवली. इतके भयाण घडले, तरी परळीचे पोलीस असे का वागतात, याचा सवाल पडत असल्याचे धस म्हणाले.
  • एका पेपरची आठ महिन्यापूर्वीची बातमी धस यांनी भरसभेत दाखवली. 
  • तीन दिवसांत 890 कोटीचे ड्रग्स जप्त, अशी बातमी ती होती. ड्रग्स म्हणजे इंजेक्शन नाही, तर अंगाला टोचायचे. रात्रभर बांगो बांगो बांगो असल्या पद्धतीचे औषध आहे. आता दम मारो दम जुना झाल्याचे ते म्हणाले. या प्रकरणात दीड वर्षापासून दत्ता आंधळे आणि कैलास सानप हे दोन आरोपी अटक आहेत. त्यांचा धनंजय मुंडेंबरोबर फोटो आहे. खरा आका, असे म्हणत धस यांनी सभेत फोटो दाखवले.

Related Articles

Back to top button