क्राईम

बिग ब्रेकिंग! संतोष देशमुख हत्या प्रकरण : आठ आरोपींना लागला मोक्का

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आठ आरोपींना आज मोक्का लावण्यात आला. सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे, महेश केदार आणि जयराम चाटे यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत खटला चालणार आहे. 

या प्रकरणातील संशयित वाल्मिक कराड याच्यावर मात्र मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई झाली नाही.

या आठही आरोपींवर एसआयटीने मोक्का लावला असून त्यांच्याकडेच या प्रकरणाचा तपास आहे. देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना मोक्का लावण्याच्या मागणीसाठी राज्यभर मोर्चे निघत आहेत. आज एसआयटीने या प्रकरणात महत्त्वाचे पाऊल उचलत घुले बंधूसह इतर पाच आरोपींना मोक्का लावला.

एखाद्या आरोपीने संघटित स्वरुपाची गुन्हेगारी केल्याचे आढळले, तर मोक्का अंतर्गत कारवाई होते. एका व्यक्तीवर मोक्का लागत नाही. मोक्का लावताना गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेतली जाते. गुन्ह्यात दोन किंवा त्यापेक्षा अधिक म्हणजेच टोळी असेल तर मोक्का लागतो. अपहरण, खंडणी, हत्या, अमली पदार्थांची तस्करी यासह गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर मोक्का लावला जातो.

देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक हा मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप होत आहे. मात्र वाल्मिकला सध्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. देशमुख हत्या प्रकरणात त्याला अटक झालेली नाही. म्हणून वाल्मिकला मोक्का लावलेला नाही. देशमुख हत्या प्रकरणाचा तपास राज्य सरकारने एसआयटी आणि सीआयडीकडे दिला आहे. खुनाच्या गुन्ह्यात कराडचा सहभाग दिसला तर त्याच्यावरही अशीच कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa