सोलापूर

ब्रेकिंग! एक कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू

  • भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एक कोटी रुपये न दिल्याने शमीला ही धमकी मिळाली आहे. शमीला ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 
  • हे उघड होताच अमरोहा क्राइम ब्रांचच्या पथकाने चौकशी सुरू केली आहे. धमकी मिळाल्यानंतर शमीने अमरोहा पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. शमीने सांगितले की, त्याला पहिला ई-मेल काल संध्याकाळी आला होता. त्यानंतर, दुसरा ई-मेल सकाळी आला आहे. शमीचा भाऊ मोहम्मद हसीबने पोलिसांना याबद्दल लेखी माहिती दिली आहे.
  • शमीने अमरोहा पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर अमरोहा क्राइम ब्रांचच्या पथकाने तपास सुरू केला आहे. पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार, कर्नाटकातील प्रभाकर नावाच्या व्यक्तीने शमीला एक मेल पाठवला आहे, ज्यामध्ये एक कोटी रुपये न दिल्यास त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Related Articles

Back to top button