क्राईम
डोळे लाल अन् मद्यधुंद रिक्षा चालकाने अचानक बदलला मार्ग! घाबरलेल्या महिलेने…

- एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पूर्व बंगळुरूमध्ये एका ३० वर्षीय महिलेने धावत्या ऑटोतून आपला जीव वाचवण्यासाठी उडी मारली. मद्यधुंद रिक्षाचालकाने अचानक मार्ग बदलत महिलेला दुसऱ्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, महिलेला असुरक्षित वाटू लागल्याने तिने रिक्षा चालकाला थांबायला सांगितले. मात्र, त्याने रिक्षा थांबवली नाही. यामुळे तिने थेट धावत्या रिक्षातून उडी मारली.
- दरम्यान महिलेच्या पतीने ही घटना सोशल मीडियावर शेअर केली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलीसांनी रिक्षा चालकाला अटक केली आहे. महिलेचा पती, एक व्यापारी असून त्याने पत्नीवर बेतलेला प्रसंग सोशल मिडियावर कथन केला आहे. यानंतर त्याची पोस्ट व्हायरल झाली आहे. पतीने त्याची पोस्ट ही बेंगळुरू शहर पोलिसांना टॅग केली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने चालक नशेत असल्याचा आरोप केला.
- थानिसांद्र येथील रहिवासी अझहर खान यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीने होरामवू ते थानिसांद्रातील त्यांच्या घरापर्यंत ‘नम्मा यात्री’ ॲपद्वारे ऑटो-रिक्षा बुक केली होती. रात्री ८.५२ च्या सुमारास चालकाने त्याला तिच्या ऑफिसपासून बसवले. चालक नशेत होता. त्याने वाटेत अचानक मार्ग बदलला.
- यामुळे घाबरलेल्या पत्नीने ड्रायव्हरला रिक्षा थांबण्याची विनंती करूनही त्याने तिचे ऐकले नाही. यानंतर रात्री ९.१५ च्या सुमारास रिक्षाचा वेग कमी झाल्याने तिने नाईलाजाने धावत्या ऑटोतून उडी मारत स्वत:चा जीव वाचवला. सुदैवाने तिला दुखापत झाली नाही.