टेक

फेसबुक, इन्स्टाग्राम अन् यूट्यूब तुमच्यावर ठेवताहेत वॉच

  • आज सगळं जगच सोशल मीडिया युजर झाला आहे. हातात स्मार्टफोन अन् त्यात फेसबुक, इन्स्टाग्राम समीकरण आहेच आहे. पण तुम्ही कधी विचार केलाय का की एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही तुमच्या मित्राशी बोललात आणि नंतर तीच गोष्ट फेसबुक किंवा इन्स्टाग्रामच्या फीडमध्ये दिसते. जर असे घडत असेल तर सोशल मीडिया ॲप्स फक्त तुमच्या पोस्टच नाही तर तुमच्या अख्ख्या लाइफस्टाइलवर नजर ठेवत आहेत. या गोष्टी हवेतल्या नाहीत या संदर्भात एका रिपोर्टमध्ये खुलासा झाला आहे. कोणकोणते सोशल मीडिया ॲप युजर्सवर पाळत ठेवतात आणि कशा पद्धतीने काम करतात याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे.
  • ब्रिटेनच्या रिसर्च फर्म Apteco च्या रिपोर्टमध्ये हा खुलासा करण्यात आला आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब यांसारखे ॲप अगदी गुपचूपपणे युजर्सच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवत आहेत. हे ॲप्स तुम्ही केलेले क्लिक, तुमच्या आवडीनिवडी, तुमचे लोकेशन, युजर्सची राजकीय विचारसरणीसुद्ध ट्रॅक करतात.
  • तुम्हाला नक्कीच धक्का बसेल कारण तुम्ही दररोज जे सोशल मीडिया ॲप वापरता तेच ॲप या यादीत सहभागी आहेत. यामध्ये Facebook, Instagram, Threads, LinkedIn, Pinterest, Amazon, Alexa, YouTube, X (आधी ट्विटर) आणि PayPal या ॲप्सचा समावेश आहे. या ॲप्सच्या माध्यमातून युजर्सचा ब्राउजिंग पॅटर्न, फायनान्शियल डिटेल्स, डिव्हाईसची माहिती इतकेच नाही तर युजर्सच्या फोनमधील कॉन्टॅक्ट लिस्ट देखील रेकॉर्ड केली जाते. या माहितीचा उपयोग युजर्सची डिजिटल प्रोफाइल तयार करण्यासाठी केला जातो. यामुळे युजर्सचा व्यवहार समजण्यात कंपन्यांना मदत मिळते.
  • ॲप्सचा वापर तर करायचा पण स्वतःची गोपनियताही राखायची असेल तर काही टिप्स माहिती असणे गरजेचे आहे. मोबाइलमध्ये एखादे ॲप डाउनलोड करताना परमिशनवर लक्ष ठेवा. 
  • नीट माहिती घेतल्यशिवाय ॲपला कोणतीही परमिशन देऊ नका. कॅमेरा, मायक्रोफोन आणि लोकेशन यांसारखी परमिशन गरज असेल तेव्हाच द्या. फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन या ॲप्सच्या परमिशनचा आढावा घ्या. कारण नसताना ॲप्सना बॅकग्राउंडमध्ये अॅक्सेस देऊ नका. प्लेस्टोरमध्ये जाऊन डेटा प्रॅक्टिस सेक्शन व्यवस्थित वाचा. ॲप डाउनलोड करताना नेहमी ऑफिशियल प्लॅटफॉर्मवरूनच डाउनलोड करा. याव्यतिरिक्त संबंधित ॲपचे रिव्यू आणि रेटिंग यावरही लक्ष द्या.

Related Articles

Back to top button