मनोरंजन
छावा चित्रपट गाजवणारा विकी कौशल किती कोटींचा मालक?

- छावा चित्रपटाने धुमाकुळ घातला आहे . विकी कौशल, रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी केली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या ऐतिहासिक चित्रपटाने प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित केले असून थिएटरमध्ये जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या ‘छावा’ सिनेमामुळे चर्चेत आहे.
- विकी कौशल याने हिट सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत. फिल्मी कुटुंबातील नसून देखील विकीने बॉलिवूडमध्ये स्वतःची भक्कम ओळख निर्माण केली आहे. विकी याच्या नेटवर्थबद्दल सांगायचे झाले तर विकीकडे 140 कोटींची संपत्ती आहे. सिनेमे, जाहिराती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून विकी गडगंज कमाई करतो.
- कोणत्याही सिनेमात मुख्य भूमिकेसाठी अभिनेता दहा ते बारा कोटी रुपये घेतात. मात्र, विकीने ‘छावा’ सिनेमासाठी दहा कोटी रुपये मानधन घेतल्याची माहिती समोर येत आहे. फोर्ब्स इंडियाच्या टॉप 100 यादीत विकीचा समावेश होता. सर्वसामान्य कुटुंबातील विकी आज त्याच्या आई – वडिलांसोबत रॉयल आयुष्य जगत आहे. विकी हा आलिशान घरात त्याच्या कुटुंबासोबत राहतो.