मनोरंजन

ब्रेकिंग! कमाल झाली, थिएटर 24 तास सुरू

  • छावा चित्रपटाने धुमाकुळ घातला आहे. विकी कौशल, रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी केली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या ऐतिहासिक चित्रपटाने प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित केले असून थिएटरमध्ये जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. देशातील काही ठिकाणचे थिएटर 24 तास सुरू आहेत.
  • मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मिती झालेल्या छावाने पहिल्या दिवशीच २८.५० कोटींचा दमदार गल्ला जमवला. चित्रपटाच्या उत्कृष्ट कथानकामुळे आणि तगड्या स्टारकास्टमुळे दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी आणखी मोठी वाढ झाली आणि तब्बल ३४ कोटींची कमाई झाली. आता तिसऱ्या दिवशी गाठला 86 कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे.
  • देशभरातील कमाईचा आकडा वाढत असताना जगभरातीलही कमाईचा आकडा वाढताना दिसत आहे. अनेक ठिकाणी चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल म्हणून दाखवले जात आहे. विकी कौशलच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून भरभरुन दाद मिळत आहे. 

Related Articles

Back to top button