महाराष्ट्र

फक्त दूषित पाणी नाही, तर यामुळेसुद्धा होते जीबीएसची लागण?

पुण्यानंतर राज्यातही गुइलेन बॅरे सिंड्रोमचे अर्थात ‘जीबीएस’चे रूग्ण वाढत आहे. कोल्हापुरात ‘जीबीएस’च्या दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘जीबीएस’ हा फक्त दुषित पाण्याने होत असल्याचे सांगितले जात होते. पण, ‘जीबीएस’ पसरण्यामागे आणखी एक कारण समोर आले आहे.

दुषित पाण्यासह कोंबड्याचे चिकन खाल्ल्यामुळे सुद्धा ‘जीबीएस’चे रूग्ण सापडत आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. त्यामुळे चिकन पूर्णपणे शिजवून खाल्ले पाहिजे, असा सल्ला अजितदादा यांनी दिला आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

अजितदादा म्हणाले, पुणे दौर्‍यात विभागीय आयुक्त मला भेटले. कच्चे चिकन खाल्ल्याने खडकवासला भागात ‘जीबीएस’चे रुग्ण जास्त सापडत आहेत, अशी चर्चा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे चिकन पूर्णपणे शिजवून खाल्ले पाहिजे. चिकन कच्चे राहिल्यास त्यातून आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. ‘जीबीएस’ आटोक्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होईल, अशी माहिती पसरता कामा नये. 

Related Articles

Back to top button