राजकीय
‘लाडकी बहीण’वरून लाडक्या बहिणी भिडल्या

- सोलापूरसह अन्य भागात लाडकी बहीण योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, या योजनेवरून विरोधक वारंवार सरकारवर टीका करत आहेत. अशामध्ये या योजनेवरून लाडक्या बहिणी भिडल्या आहेत. काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे यांनी या योजनेवरून सरकारवर टीका केली. याला महिला आणि बाल विकासमंत्री अदिती तटकरे यांनी यांनी बेधडक प्रत्युत्तर दिले आहे.
- प्रणिती शिंदे यांनी या योजनेवर टीका करताना सांगितले की, लाडकी बहीण योजना ह्या निवडणुकींसाठी चुनावी जुमला होता. त्यांनी तो व्यवस्थित खेळला. या योजनेमुळे महाराष्ट्र दिवाळखोर झाला आहे, असा रिपोर्ट येत आहे. इतर योजनांचे पैसे थांबवले आहेत. तिजोऱ्या रिकाम्या पडल्या आहेत. लाडकी बहीण आतुरतेने वाट पाहत आहे, तिला सावत्र करू नये.
- दुसरीकडे अदिती तटकरे यांनी प्रणिती यांना प्रत्युत्तर दिले आहे. सुरूवातीपासूनच विरोधकांना लाडकी बहीण योजनेची अॅलर्जी आहे. एका बाजूला दीड हजार रुपये दिले तर राज्य आर्थिक संकटात येईल म्हणतात आणि दुस-या बाजूला तीन हजार रुपये देण्याचे वक्तव्य करतात. हे बोलणे दुटप्पीपणाचे आहे. तसेच पुढच्या काळात लाडकी बहीण योजना अशीच चालूच राहणार असून महिलांना अधिक आर्थिक सक्षम करण्यासाठी आमचे प्रयत्न असतील, असे तटकरे यांनी सांगितले.



