महाराष्ट्र

धनंजय मुंडेंचा पत्ता कट?

मागील अनेक दिवसांपासून बीडचा पालकमंत्री कोण असणार, याची चर्चा सुरू होती. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण समोर आल्यानंतर राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होऊ लागले. त्यामुळे मुंडे यांना पालकमंत्री पद देण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात येत होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडचा पालकमंत्री ठरला असून मुंडे यांचा पत्ता कट झाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यात झालेल्या चर्चेनंतर बीडच्या पालकमंत्री पदाबाबत निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री पदावरून मुंडे यांचा पत्ता कट झाला असून चुलत भगिनी आणि राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनादेखील संधी नाकारण्यात आली आहे. 

मुंडे यांना बीडचे पालकमंत्री पद देण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात येत होती. बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी फडणवीस यांनी घ्यावी, अशी मागणी करण्यात येत होती. मात्र, बीडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय फडणवीस आणि अजितदादा यांनी चर्चा करून घेतला आहे. बीडचे पालकमंत्री पद अजितदादा यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Related Articles

Back to top button