मनोरंजन

सर्वात मोठा अ‍ॅक्शनपट ‘रानटी’ सिनेमाची सर्वत्र हवा

  1. कोणत्याही चित्रपटाच्या यशामागे अनेक घटक कारणीभूत असतात. जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स, दमदार डायलॉग आणि इमोशन ड्रामा याचे पॅकेज असलेल्या ‘रानटी’ चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. अनोखे टिझर, लक्षवेधी पोस्टर्स, उत्कंठावर्धक ट्रेलर आणि आघाडीच्या कलाकारांच्या फळीमुळे रसिकांची उत्सुकता अक्षरश: शिगेला पोहोचली आहे.
  2. नायक आणि खलनायकात रंगणारे सूडनाट्य बघायला प्रत्येकालाच आवडते. त्यालाच अ‍ॅक्शनचा तडका देऊन त्या पार्श्वभूमीवर रंगणारा एका वेगळ्या जॉनरचा चित्रपट मराठीत आला आहे. त्यामुळे प्रेक्षक आणि समीक्षकांनीही या चित्रपटाचे विशेष कौतुक केले. ‘रानटी’ चित्रपट म्हणजे मनोरंजनाचा हुकुमी एक्का आहे अशी भावना सध्या प्रेक्षकवर्गात आहे. चित्रपटाचा वेग, निर्मितीमूल्य, त्याची मांडणी हे सगळं लार्जर दॅन लाईफ दाखविण्यात हा चित्रपट यशस्वी झाल्याच्या भावना प्रदर्शित झालेल्या टिझर, ट्रेलरवरून प्रेक्षक व्यक्त करत आहेत.
  3. प्रदर्शना आधीच ‘रानटी’ चे सर्व शो हाऊसफुल्ल झाले. ‘बुक माय शो वर या चित्रपटाची जोरदार तिकीट विक्री झाली आहे. ‘रानटी’ चित्रपटातून रुपेरी पडद्यावर ‘अँग्री यंग मॅन’ म्हणून आलेल्या अभिनेते शरद केळकर यांचा डॅशिंग लूक ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. चित्रपटातील गाण्यांनाही प्रेक्षकांची वाहवा मिळाली आहे.
  4. शरद केळकर यांच्यासोबत संजय नार्वेकर, संतोष जुवेकर, नागेश भोसले,जयवंत वाडकर, संजय खापरे, छाया कदम,अक्षया गुरव, कैलास वाघमारे, माधव देवचक्के, सुशांत शेलार,हितेश भोजराज, सानवी श्रीवास्तव,नयना मुखे या कलाकारांच्या भूमिकाही प्रेक्षक कौतुकास पात्र ठरल्या आहेत. 

Related Articles

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa